सिल्व्हर ज्युबिलीच्या गुणवंतांना 1 लाख 62 हजार 700 रुपयांची रोख पारितोषिके प्रदान

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : के. एल. ई. सोसायटी बेळगावी संचलित सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिकसह गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी सतत प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने दरवर्षी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येतो. यावर्षीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी संजय धारूरकर मंत्रालयातील महसूल विभागाचे मंत्रालय उपसचिव, महाराष्ट्र शासन, मुंबई यांची विशेष उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी स्थानिक नियामक मंडळ, बार्शीच्या सौ वर्षाताई ठोंबरे या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिरुद्ध चाटी यांनी प्रास्ताविक सादर केले. पारितोषिक दात्यांच्या देणगीतून याप्रसंगी रोख रकमेचे वाटप करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अहवाल वाचन पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महेश गणाचार्य यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा व अध्यक्षांचा परिचय सचिन झाडबुके व सतिश होनराव यांनी केला. शैक्षणिक, कला, क्रीडा, शिष्यवृत्ती परीक्षा, एनसीसी, एसएससी बोर्ड परीक्षा 2025, शासकीय चित्रकला परीक्षा, सामान्य ज्ञान परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके, प्रमाणपत्र व रोख रक्कम 1,62,700 देऊन गौरविण्यात आले. एसएससी बोर्ड परीक्षा 2025 मधील 100% गुण मिळवून प्रथम आलेल्या कु. तनिष्का उमेश फल्ले या विद्यार्थिनीस मान्यवरांच्या शुभहस्ते रोख 22,000 रुपये बक्षीस देण्यात आले. बक्षिसांचे वाचन हेमंत गाढवे, गणेश ऐनापुरे, नागेश जमदाडे, शिवराज भडुळे , साताप्पा पोमाजी, सौ. जयदेवी खराडे, सौ. प्रविणा झाडबुके, केदार गुडे, आनंद जमदाडे यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे पालक व सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. प्रमुख अतिथिनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य,कठोर मेहनत, विनम्रता यामुळे यश मिळते असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ वर्षाताई ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर सांगितले की, आपल्या आवडत्या क्षेत्रातील कौशल्य प्राप्त करण्यासाठी शालेय जीवनापासून सुरुवात केली पाहिजे. पारंपरिक करिअर क्षेत्रापेक्षा वेगळे क्षेत्र निवडण्याचे धाडस केले पाहिजे. आज क्रीडाक्षेत्र हे करिअरसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे असे सांगितले.

याप्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक महेश गोदेपुरे, पर्यवेक्षिका सौ अनुराधा विश्वेकर, विद्यार्थी प्रतिनिधी चि. अपूर्व उकिरडे, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. समृद्धी उकिरडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. शुभांगी म्हमाने यांनी मानले. प्रशालेचे शिक्षक श्रीधर डिकुळे यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन सौ. ज्योत्स्ना जमदाडे व सौ सोनाली हुलमनी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रवींद्र मठपती, रवींद्र मेनकुदळे, विश्वास चौधरी, संतोष बिराजदार, प्रकाश पावले, सौ. शिल्पा फल्ले, सौ. जयश्री वालवडकर, सूर्यकांत आदलिंगे, राहुल मुनाळे, अजय मुरकुटे व सर्व शिक्षक, शिक्षिका, एनसीसी विद्यार्थी, क्रीडा विभाग, सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या