जयंतीबार्शीमहाराष्ट्र

बार्शी येथे श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सुतार नेट, बार्शी येथे श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचा श्री विश्वकर्मा यांचा फोटो देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास बप्पा सुतार,संदीप सुतार, निशिकांत सुतार, सुरेश सुतार, विष्णू सुतार (खांडवी), दीपक सुतार (सौंदरे), मुकुंद सुतार, समाधान राऊत, संभाजी सुतार, श्री भागवत वेगवान पालटे तसेच लोंढे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुंड सर व सौ. राऊत मॅडम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमानिमित्त आयोजित कीर्तन ऐकण्यासाठी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महिला मंडळाने विशेष योगदान दिले, हे विशेष उल्लेखनीय ठरले.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button