राज्यपाल आचार्य देवव्रत यांचेकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली शपथ
B1न्यूज मराठी नेटवर्क
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकभवन येथे साधेपणाने झालेल्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेसह सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.




