प्लॅस्टिक राष्ट्रध्वज वापरास बंदी; ध्वजसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकच्या वापरास, तसेच प्लॅस्टिक राष्ट्रध्वज निर्मिती व वापरास मान्यता नसल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.) यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रध्वज रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी फेकून देऊ नयेत. खराब झालेले राष्ट्रध्वज आढळून आल्यास ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार त्यांचा सन्मानपूर्वक नाश करणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान किंवा विटंबना करणे हे बोधचिन्ह व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950, राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 तसेच ध्वजसंहितेनुसार दंडनीय गुन्हा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तसेच, कोणतेही खराब राष्ट्रध्वज आढळून आल्यास ते सन्मानपूर्वक गोळा करून नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात जमा करण्याचे आवाहन त्यांनी जनतेस केले आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा देत ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या