शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या येाजनांसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

चंद्रपूर, दि. 21 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ या कार्यालयामार्फत रोजगार व स्वयं रोजगार करण्याच्या उद्देशाने अनुसूचित जमाती (ST) या प्रवर्गातील वय वर्ष 18 ते 45 दरम्यान असणारे स्त्री-पुरुष व बचत गट यांना दीर्घ मुदतीवर अल्प व्याजदराने विविध कर्जाचे वितरण होत असते. त्यानुषंगाने या कार्यालयाकडे सन 2025-26 या वर्षाकरिता राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नवी दिल्ली पुरस्कृत कर्ज योजनेच्या धर्तीवर राज्य शासन पुरस्कृत मुदत कर्ज योजना व राज्य शासन पुरस्कृत महिला सशक्तीकरण कर्ज योजना लक्षांक/ उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. सदर लक्षांक मर्यादित वेळेत पूर्ण करावयाचे असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

यात 1. महिला सबलीकरण योजना (लक्षांक 6), 2.कृषी आणि संलग्न व्यवसाय (2), 3.हॉटेल / ढाबा ( 2), 4.ऑटो वर्कशॉप / स्पेअर पार्ट / गॅरेज (2), 5. वाहन व्यवसाय (प्रवासी किंवा मालवाहू), (1), 6.वाहन व्यवसाय (प्रवासी किंवा मालवाहू) (1), 7. लघु उद्योग व्यवसाय 2), 8.ऑटो रिक्षा / मालवाहू रिक्षा ( 1), 9.स्वयं सहायता बचत गट (2) चा समावेश आहे. उपरोक्त नमूद लक्षांकात बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक नाशिक यांना राहतील, असे शाखा व्यवस्थापक आर.एस. भदाणे यांनी कळविले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या