पत्नीची हत्या; न्यायालयाने भातंबरे येथील आरोपीस, ठोठावली जन्मठेप शिक्षा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : वैराग पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याची हकीकत की वैराग येथे दि.23/11/2021 रोजी सकाळी 11/30 वाजता दरम्यान सदरचा गुन्हा घडला तो असा आरोपी नामे १) किरण तुकाराम घरबुडवे वय 43 रा. भातंबरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हा धामणगाव येथून त्यांचे गावी भातंबरे ता. बार्शी येथे जात असताना मौजे मुंगशी आर ते उपळे दुमाला जाणारे रोडचे दरम्यान पत्नी व दोन मुले यांचेसह त्यांचे मोटारसायकलवरून जात असताना रोडवर मयत आरोपीची पत्नी सोनाली हीस तीचे वडीलांचे शेतजमीनीपैकी तीचे हिश्याची असलेली जमीन घेणेबाबत मयत सोनालीस वारंवार सांगत होता, परंतु मयत सोनाली ही वडीलांचे जमिनीमध्ये हिस्सा घेत नव्हती याचा राग मनात धरून आरोपी किरण घरबुडवे याने पत्नी सोनाली हिस चिडून जाऊन लोखंडी कोयत्याने डोक्यात मानेवर वार करून जीवे ठार मारले.

म्हणून फिर्यादी अतुल दिलीप हेडंबे यांनी आरोपी किरण तुकाराम घरबुडवे वय 43 रा. भातंबरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर याचे विरुद्ध वैराग पोलीस स्टेशन येथे गु र नंबर 571/2021 भा. द. वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंदवला त्यानंतर तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक विनय रामचंद्र बहिर यांनी आरोपीस ताब्य ताब्यात घेऊन सबळ पुरावा गोळा करून आरोपी विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.. त्यानंतर सदर खटल्याची सुनावणी मध्ये सहाय्यक सरकारी अभियोगता दिनेश देशमुख यांनी काम पाहिले सदर खटला मध्ये सुनावणी दरम्यान फिर्यादी, आरोपीची मुलगी इतर साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली

सदर प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले तसेच तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे हे सरकारी वकील यांनी माननीय न्यायालयासमोर मांडले सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. व्ही एस मलकलपट्टी रेड्डी मॅडम यांनी आरोपी किरण तुकाराम गरबुडवे यास भादवि कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड जर दंड नाही भरला तर सहा महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड दिनेश देशमुख साहेब यांनी काम पाहिले सदर केस मध्ये माननीय अशोक गुलाबराव सायकर उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग बार्शी व माननीय पोलीस निरीक्षक कुंदन गावडे वैराग पो. स्टेशन यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विनय रामचंद्र बहिर यांनी केला होता तसेच कोर्ट पैरवी म्हणून कोर्ट पैरवी अधिकारी पोहे कॉ 895 कुणाल पाटील यांनी काम पाहिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या