आरोग्यमहाराष्ट्रसोलापूर

जिल्ह्यातील पाच वर्षाखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये – अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

रविवार, 28 जून रोजी जिल्ह्यात पाच वर्षाखालील 4 लाख 36 हजार बालकांचे लसीकरण होणार, 7 हजार 222 मनुष्यबळाची नियुक्ती राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्याचे अपर जिल्हाधिकारी यांचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर द‍ि. 25 : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या कालावधीत ० ते ५ वयोगटातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. कोल्ड चेन, वाहनांची सोय, जनजागृती प्रचार व प्रसिद्धी तसेच लोकांचा सहभाग यावर भर देऊन मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहीम जिल्हा समन्वय समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.500जिल्ह्याच्या शहरी व गमीण भागातील प्रत्येक पाच वर्षाखालील बालकापर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचून त्या बालकांचे लसीकरण करावे. यासाठी शहर व ग्रामस्तरावर शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीद्वारे जनजागृती करावी. आरोग्य यंत्रणे पुरेसे मनुष्बळाचे नियोजन करून ही मोहीम यशस्वी करावी त्यासाठी प्रत्येक वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा अशा सूचना निऱ्हाळी यांनी दिल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी माहिती दिली की, दि. २८ जून २०२६ रोजी रविवारी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यातील ५ वर्षाखालील ४,३६,५७२ बालकांना लस पाजण्यासाठी ग्रामीण भागात ५५७०, शहरी भागात ५७० व महानगरपालिका क्षेत्रात ३७३ लसीकरण बूथची सोय करण्यात आली आहे. मोहिमेसाठी ७२२२ कर्मचारी नियुक्त असून पर्यवेक्षणासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.500अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे यांनी सांगितले की, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, विटभट्टी, साखर कारखाने, यात्रा व लग्न समारंभ अशा गर्दीच्या ठिकाणी पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भटक्या वसाहती व उसतोड कामगारांच्या वसाहतीतील बालकांसाठी मोबाईल टीमची सोय करण्यात आली आहे.

या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी श्री प्रकाश नांगरे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री धनंजय वाळा, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री हेमंत पवार, परिचारिका सपना सोनवणे व साधना शिरसाट, वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ओमकार येमुल, सहाय्यक प्राध्यापक डॉ. तिरुपती चोरमले तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button