बार्शी शहर पोलीस ठाणे च्या वतीने बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहर पोलीस ठाणे आवारात असणारी बेवारस वाहने जमा असलेल्या त्या वाहनांचा लिलाव करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झालेली असल्यामुळे व तसेच बार्शी तहसिलदार यांनी जा.क.जबाबि/कवि १३/२०२६ दि १५/०१/२०२६ अन्वये बेवारस वाहनांचा लिलाव काढण्यास परवानगी दिलेली आहे.तरी बार्शी शहर पोलीस ठाणे येथील २८ बेवारस मोटासायकल वाहने यांचा जाहीर लिलाव दि. २०/०१/२०२६ रोजी दु .ठीक १.०० वा. होणार आहे. लिलाव करून आलेली रक्कम ही शासनास जमा करण्यात येणार आहे. तरी इच्छुक व्यवसायिकांनी दि. २०/०१/२०२६ रोजी सकाळी ११.०० वा बार्शी शहर पोलीस ठाणे येथे उपस्थीत राहवे.जाहीर लिलावाकरीता इच्छुक व्यावसायिक यांना खालीलप्रमाणे अटी व शर्ती आहेत.
सदर व्यक्तीकडे व्यवसायाचा परवाना व जीएसटी नंबर असणे आवश्यक आहे.
सदर व्यक्तींची नोंदणी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे दि.२०/०१/२६ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० वा करण्यात येणार आहे. त्यानंतर आलेल्या व्यक्तींना लिलाव मध्ये सहभाग घेता येणार नाही.
सदर व्यक्तींवर कुठल्याही प्रकाराचा गुन्हा दाखल नाही पाहीजे. गुन्हा दाखल असल्यास निकालाची प्रत सोबत आणावी.
लिलावामध्ये सहभाग घेण्यासाठी अनामत रक्कम रोख स्वरूपात १ लाख १५ हजार एवढी ठेवलेली आहे.
बेवारस मुददेमालामधील वाहने हे रस्त्यावर वापरता येणार नाहीत. ते सर्व स्कॅप करण्यात यावे
वाहने स्कॅप न करता रोडवर वापरल्यास गुन्हा नोंद करून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.




