अपघातमहाराष्ट्रयोजनावर्धा

मत्स्यमार अपघात विमा योजनेंतर्गत अर्थसहायाचे वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क

वर्धा : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत भूजलाशयीन पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन या प्रकल्पाचे लाभार्थी मृतक अनिल देविदास वहिले यांची वारसदार पत्नी जया अनिल वाहीले (गुंजी, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती) यांना प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मच्छिमारांसाठी अपघात गटविमा योजनेतुन 5 लक्ष रुपयाचे अर्थसहाय्याची रक्कम बँक खात्यात वाटप करण्यात आली.

जिल्ह्यातील निम्न वर्धा जलाशयामध्ये प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत भूजलाशयीन पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन या प्रकल्पाचे लाभार्थी मृतक अनिल देविदास वहिले यांचा मत्स्य व्यवसाय विभागामार्फत विनामुल्य विमा काढण्यात आला होता. त्यांचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यु झाला असल्यामुळे त्यांच्या वारसास 5 लक्ष रुपयाचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले.

जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी अपघात गटविमा योजनेतून विमा काढण्यासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयास भेट देऊन विमा काढून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button