बार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

भैरवनाथ विद्यालयात बाल आनंद बाजार उत्साहात संपन्न

29 हजार 725 एवढ्या रुपयांची उलाढाल

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळी ता. बार्शी येथे या वर्षाचा बाल आनंद बाजार अगदी उत्साहात संपन्न झाला. या बाल आनंद बाजाराचे उद्घाटन गुळपोळी गावातील प्रतिष्ठित नागरिक युवा नेते गणेश चिकणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शिरीष चिकणे (सरपंच गुळपोळी) दत्तात्रय काळे (माजी उपसरपंच) यांचेसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या आनंद बाजारामध्ये विविध प्रकारच्या भाजीपाला यामध्ये मेथी, पालक ,चुका,कोथिंबीर, करडई, शेवगा, शेपा ,कारले, भेंडी, वांगे, टोमॅटो, पालक, कोबी, शेवगा, फुलकोबी, वाटाणा, बोरे , पेरू,तसेच इतर अनेक भाज्या मुलांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. या बरोबरच खाऊ गल्ली थाटात होती.यामध्ये भेळ, समोसा, वडे ,राजगिरा लाडू, शेंगदाणा लाडू, लस्सी, दही धपाटे, पाणीपुरी, चिक्की,तसेच इतर खाद्यपदार्थ, पदार्थ होते.

तसेच काही स्टेशनरी वस्तूची दुकाने सुद्धा होती. प्रशालेतील विद्यार्थी आपापले विक्री कौशल्य वापरून आपापल्या वस्तू विकत होते. या बाजारामुळे शाळेतील मुलांना विक्री कौशल्य शिकण्यासाठी मिळाले.तसेच.व्यवहारिक ज्ञान मिळाले.या सर्व खरेदी करता गुळपोळी गावातील तसेच परिसरातील महीला पुरुषांनी खूप गर्दी केली होती.आपलेच मुले चांगल्या पद्धतीने विक्री करत आहेत याचा आनंद पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या आनंद बाजारातून जवळपास 29 हजार 725 एवढ्या रुपयांची उलाढाल झाली.

एकंदरीत हा बाल आनंद बाजार आनंदी व उत्साही वातावरणामध्ये पार पडला. हा बाजार पार पाडण्याकरता प्रशालाचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख सर, जेष्ठ शिक्षक चिकणे सर यांचे सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button