सेवा, शौर्य, समर्पन, विश्वास अर्थातच महाराष्ट्र पोलीस दल बार्शी शहर पोलीस स्टेशनच्यावतीने रायझिंग डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सेवा, शौर्य, समर्पन, विश्वास अर्थातच महाराष्ट्र पोलीस दल बार्शी शहर पोलीस स्टेशनच्यावतीने रायझिंग डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बार्शी शहर पोलीस स्टेशनच्यावतीने महाराष्ट्र पोलीस दल रायझिंग डे निमित्त दिनांक ०२/०१/२०२६ ते ०८/०१/२०२६ रोजी पर्यंत नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन सत्र, सामाजिक संवादसह सामाजिक उपक्रम तसेच शिवाजी कॉलेज येथे कबड्‌डी स्पर्धा, अतिरेकी हल्ल्याचे प्रात्यक्षिक, वाहतुक सुरक्षेबाबत नागरिक व कॉलेजचे विद्यार्थी यांच्यात जनजागृती करणे तसेच सायबर क्राईमबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

आज दिनांक ०२/०१/२०२६ रोजी साधना कन्या प्रशाला बार्शी येथील विद्यार्थ्यानां पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज, वेगवेगळ्‌या शस्त्राची माहिती, नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणा-या उपाययोजना, कायदा व सुव्यस्था राखण्याबाबतची जबाबदारी तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना जसे की, महिला विद्यार्थी, नागरीक कोणत्याही आपत्कालीन परिस्थीत डायल ११२ या हेल्पलाईन नंबरला संपर्क करून मदत घेवु शकतात त्याचबरोबर कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली असुन यावेळी बालाजी कुकडे, पोलीस निरीक्षक बार्शी शहर, श्रीमती सोनम जगताप पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार बांधव तसेच पोलीस अंमलदार उपस्थित होते.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या