व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी शहराध्यक्षपदी निलेश झिंगाडे, उपाध्यक्षपदी मयूर थोरात तर सचिवपदी समाधान चव्हाण यांची निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी शहराची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत शहर कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी निलेश झिंगाडे, उपाध्यक्षपदी मयूर थोरात तर सचिवपदी समाधान चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अजित कुंकूलोळ होते.

यावेळी मागील वर्षाचे अध्यक्ष शाम थोरात यांनी आपला कार्यभार नूतन अध्यक्ष निलेश झिंगाडे यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्त केला. तसेच जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल अजित कुंकूलोळ यांनी ओंकार हिंगमिरे यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

बैठकीत मागील वर्षभरातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच येत्या ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करून कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.

तसेच आगामी वर्षात पत्रकारांच्या अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना, संघटन बळकटीकरण, प्रशिक्षण उपक्रम, तसेच पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे काम करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून पत्रकारांसाठी अधिक संघटित, सक्षम आणि प्रभावी कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगचे राज्य कोषाध्यक्ष प्रविण पावले, जिल्हा सचिव ओंकार हिंगमिरे यांच्यासह शाम थोरात, प्रदीप माळी, विजय शिंगाडे, जमीर कुरेशी, अपर्णा दळवी आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या