न्याय विभागबार्शीमहाराष्ट्र

ॲट्रॉसिटी आणि तलवारीने गंभीर मारहाणीचा आरोप असलेल्या आरोपीचा जामीन अर्ज मंजूर

बार्शी येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा आदेश

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी येथील वैराग पोलिस स्टेशन येथे फिर्यादी सचिन गोविंद मोहिते हे दि.२६/११/२०२५ रोजी भाजी आणणेकरीता मोटारसायकवरुन जात असताना आरोपीने हाक मारून त्याच्या दुकानात बोलावून घेतले व जातीवाचक शिविगाळी करून ,टायरची रिम का बदललीस म्हणून तलावारीने व शॉकअपसर पाईपने डोक्यात व डाव्या हातावर मारहाण केल्याप्रकरणी भा.न्या.सं कलम-११८ (१)३५२,३५१(२),३५१(३) व आर्म्स ॲक्ट १९५४ कलम-४,२५ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे आरोपी योगेश बाळकृष्ण हजारे याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

यावेळी आरोपीच्यावतीने अ‍ॅड.राहुल पाटील यांनी आरोपीचे कामकाज पाहणेकामी जामीन अर्ज दाखल केला होता.सदरच्या जामीन अर्जावर झालेल्या युक्तीवादावेळी आरोपीच्यावतीने अ‍ॅड.राहुल पाटील यांनी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीत व मेडीकल रिपोर्टमध्ये तफावत असल्याचे मा.न्यायालयाच्या समोर मांडून जोरदार युक्तिवाद केला.

अ‍ॅड.राहुल पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.व्ही.के.मांडे साहेब यांनी आरोपी योगेश बाळकृष्ण हजारे याचा जामीन अर्ज मंजूर केला.याकामी आरोपीतर्फे अ‍ॅड.राहुल पाटील,अ‍ॅड.विवेक गजशिव,अ‍ॅड.श्रीराम काशीद,अ‍ॅड.राजकुमार गुंड यांनी कामकाज पाहिले.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button