सुयश विद्यालय, बार्शी येथे गणित दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील सुयश विद्यालय येथे दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय गणित दिन विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण करणे, तार्किक विचारशक्ती विकसित करणे तसेच गणिताचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी गणितीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गणितीय सूत्रे, संकल्पना, आकृत्या व संख्या यांचे रंगीबेरंगी रांगोळ्यांच्या माध्यमातून सर्जनशील सादरीकरण केले.

तसेच इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन करून गणिताविषयी भाषणे, कविता व उपयुक्त माहिती सादर केली.याशिवाय इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित क्वीझ स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व आपल्या गणितीय ज्ञानाचे प्रभावी प्रदर्शन केले.

वरील सर्व स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी संस्थेचे संस्थापक शिवदास नलावडे,संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. प्रतिभा नलावडे ,मुख्याध्यापिका अलका जगताप तसेच उपमुख्याध्यापक संदीप येवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रसंगी स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकवृंदांच्या वतीने मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन करण्यात आले.या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळाल्याचे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या