बार्शी बसस्थानक पुनर्बांधणी साठी १०कोटी ७७ लाखाची निविदा प्रसिद्ध-आ. दिलीपराव सोपल
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी बसस्थानक ची दुरवस्था दूर करणेसाठी शासन स्तरावर प्रयत्न करून पुनः बांधणी साठी १० कोटी ७७ लाखाचा भरघोस निधी मिळवला असून राज्य मार्ग परिवहन मंडळ कडून या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी दिली आहॆ.
आ. सोपल पुढे बोलताना म्हणाले की, मराठवाड्याचे प्रवेश द्वार असलेले बार्शी बसस्थानक पश्चिम महाराष्ट्र मधील सर्वाधिक मोठे उत्पन्न देणारे बसस्थानक असताना मोठी दुरावस्था होती, इमारत अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.
आ. सोपल पुढे म्हणाले या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातून तसेच वर्तमाणपत्र मधून वारंवार प्रसिद्ध होत असलेली दुरावस्थे ची छायाचित्रे बातम्या सह परिवहन मंत्री ना प्रताप सरनाईक यांना समक्ष भेटून व्यथा मांडली होती.
दरम्यान बी.ओ.टी. तत्वावरील प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित होता मात्र फिजिबिलीटी नसल्यामुळे या बाबत ची कार्यवाही पुढे होत न्हवती या पार्श्वभूमीवर ते जेंव्हा होईल तेंव्हा होऊ द्या आता ची दुरावस्था बघवत नाही त्यामुळे शासनाने स्व निधीतून दुरावस्था दूर करण्याची मागणी लावून धरल्यानंतर ना. सरनाईक यांनी याबाबत आदेश देऊन मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व पालकमंत्री ना. प्रताप सरनाईक यांचे आभार..!
बस स्थानक चौक येथे होणारी वाहतुकीची कोंढी दूर करण्यासाठी आगारात येणाऱ्या एस टी बस वेअर हाऊस रोड च्या बाजूने प्रवेश द्वार केल्यास स्टॅन्ड चौकातील वाहतूक कोंढी तुन सुटका होईल तशा सुचना प्रशासनाला दिल्या होत्या त्याप्रमाणे प्रवेश द्वार साठी भिंत पाडून गेट बसविण्यात आले आहॆ ते लवकर सुरु कटण्याची कार्यवाही लवकरच होईल असेही आ. सोपल यांनी सांगितले.




