सोलापूर

कै. आमदार आण्णासाहेब पाटील यांची ८८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा

B1न्युज मराठी नेटवर्क / प्रतिनिधी दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक,माथाडी कामगारांचे आराध्य दैवत,थोर मराठा कै. आमदार आण्णासाहेब पाटील यांची ८८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.

यावेळी आण्णासाहेब पाटील चौक,वाखरी येथे प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी वाखरीचे सरपंच तुकाराम पोरे, चंद्रकांत मस्के (सदस्य ग्रामपंचायत), महादेव मोरे (कॉन्ट्रॅक्टदार), विष्णू पवार, पांडुरंग धुमाळ, हनुमंत कदम सर मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा अर्जुनराव चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे,तालुकाध्यक्ष संतोष जाधव,शहराध्यक्ष अमोल पवार,शहर संघटक काका यादव,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड, विभाग प्रमुख पांडुरंग शिंदे, सोमनाथ झेंड,जीवन पोरे, आनंद काळे,नागेश बागल, प्रतीक झेंड,आशिष शिंदे, भाऊराव जाधव, कुमार उपळकर,धैर्यशील मस्के यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button