धाराशिवमहाराष्ट्र

तुळजापूर येथील मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी अर्ज सुरु

B1न्यूज मराठी नेटवर्क

धाराशिव : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींसाठीच्या शासकीय वसतिगृह, तुळजापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ करिता मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे वसतिगृह फिल्टर टाकी शेजारी, नळदुर्ग रोड, तुळजापूर येथे असून येथे अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती,आर्थिकदृष्ट्या मागास,अनाथ,दिव्यांग अशा मागासवर्गीय व गरजू विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे.

स्थानिक शाळा अथवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींसाठी ही सुवर्णसंधी आहे.प्रवेश अर्जासाठी पात्र विद्यार्थिनींनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ११ जून २०२५ पासून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येत आहे.गुणवत्तेनुसार, सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण या निकषांनुसार निवड होणार आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी गृहपाल एस.ए.मगर (मो. 8329730823) किंवा श्रीमती पी. एस. राजपूत (मो. 9503414403) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button