महानगरपालिकामहाराष्ट्रसोलापूर

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिवसेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीच्या निमित्ताने शहरात राजकीय चुरस पाहायला मिळाली असली, तरी निवडीनंतर मात्र महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि प्रगल्भ राजकारणाचे दर्शन घडले. शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार प्रियदर्शन साठे यांनी लोकशाहीचा आदर्श घालत नूतन महापौर विनायक कोंड्याल यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना ‘भारतीय संविधानाची’ प्रत भेट दिली.

संविधानाला अभिवादन करूनच पाऊल
महापौर निवडीच्या प्रक्रियेपूर्वी प्रियदर्शन साठे यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. संविधानाच्या निर्मात्याला अभिवादन करूनच त्यांनी महानगरपालिकेत पहिले पाऊल टाकले. ‘संविधान सर्वोच्च आहे’ हा संदेश त्यांच्या या कृतीतून दिसून आला.

संविधानाच्या चौकटीत कामाचा आग्रह
निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रियदर्शन साठे यांनी नूतन महापौर विनायक कोंड्याल यांची भेट घेतली. यावेळी त्यांना संविधानाची प्रत देताना साठे यांनी शुभेच्छा दिल्या. “राजकीय संघर्ष आपल्या जागी असतो, मात्र लोकशाहीत संविधानाचे स्थान सर्वोच्च आहे. आगामी काळात संविधानाचा सन्मान राखून, त्याच्या चौकटीत राहूनच सोलापूरकरांची सेवा व्हावी आणि सर्व समाजघटकांना समान न्याय मिळावा,” अशी भावना साठे यांनी यावेळी व्यक्त केली.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संविधानाचा मार्गच सर्वोच्च मानून महापौरांनी कार्यभार सांभाळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पराभव किंवा विरोध बाजूला सारून लोकशाही मूल्यांची जोपासना करणाऱ्या या कृतीचे सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून मोठे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button