महाराष्ट्रसोलापूर

पंतप्रधानानी पाठवलेल्या पोस्टकार्ड मधील प्रश्नाचे उत्तर द्यावीत – आमदार प्रणिती शिंदे

सोलापूर शहर युवक काँग्रेसकडून पोस्टकार्ड मोहीम

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई व मोदी आदानी भ्रष्टाचार संबंधी प्रश्न विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 5000 पोस्ट कार्ड पाठवून मोहीम शुभारंभ मुख्य पोस्ट कार्यालय, रेल्वे टेशन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे व युवक काँग्रेस शहर अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने देशभरात पोस्ट कार्ड मोहीम सुरू करण्यात आलेले आहे. आज सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने पोस्टकार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध प्रश्न विचारून उत्तर देण्यासाठी पोस्ट कार्ड पाठवण्यात आले या पोस्ट कार्ड मध्ये राहुल गांधी यांच्यावर केलेल्या अन्यापूर्वक कारवाईवरील प्रश्न व मोदी आदानी यांच्यातील भ्रष्टाचारातील संबंध यावर विविध प्रश्न पाठवण्यात आलेले आहे.

आमदार प्रणिती शिंदे आपल्या मनोगत बोलताना म्हणाले देशाची वाटचाल हुकूमशाही कडे चालू आहे. राहुल गांधी वरील केलेली कारवाई लोकशाही विरोधी आहे.आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. आज पोस्ट कार्ड आम्ही पंतप्रधानास पाठवीत आहे ते मध्येच गहाळ होईल. या पोस्ट कार्ड मधून पंतप्रधानास प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असे ते म्हणाले.

यावेळी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर,अनंत म्हेत्रे, प्रवीण जाधव,ओमकार गायकवाड,विश्वराज चाकोते,उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, सुमित गडगी,प्रवीण वाले, प्रतीक आबुटे,राजासाहेब शेख, शरद गुमटे, अनिल जाधव,युवराज जाधव,विवेक इंगळे, सुनील सारंगी, सुशीलकुमार म्हेत्रे,धीरज खंदारे, समीर काझी, कुणाल गायकवाड, शशिकांत शेळके, महेंद्र शिंदे,मनोहर चकोलेकर,संजय गायकवाड,सुभाष वाघमारे, अजिंक्य पाटील ,आशुतोष वाले,बबलू जाधव ,मनोज आदटराव,चंद्रकांत नाईक,प्रतीक शिंगे, श्रीशैल रणखांबे,सिद्धू कोलकर,यासीन शेख, महेश स्वामी,ऋषी शिंगारे,विवेक म्हेत्रे,अमोल बगले,रेवण मेंडगुदले,अजय म्हेत्रे,अमित देशमुख, सचिन गाडे शरणप्पा कोकरे,ओंकार म्हेत्रे, दीपक बोडू,विशाल बंदपट्टे, बाबा वाडेकर,अक्षय वाडेकर, सचिन बहिरवाडे,मंगेश होटगी, बालाजी वकडदेवी, विजय मोरे,लालू भंडारी,शंकर धोत्रे,गणेश धोत्रे, श्रावण भोरे,सुशांत सोकुलु,प्रशांत गुंडला ,अनिकेत भिसे,अनुज भिसे,हर्षद पवार,गणेश देवसाने,योगेश सोलापुरे,लखन रणदिवे, गणेश वाघमारे, मानू पासवन,अभिलाश अचुगटला, ओमकार शिंदे प्रफुल्ल फडतरे, दशरथ चव्हाण, ज्ञानू राठोड, चरण राठोड, गणेश पवार, अजय देशमुख व इतर युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button