निवडणूकबार्शीमहाराष्ट्र

बार्शी नगरपरिषदेच्या मतदारांना मुख्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : आगामी बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 निमित्ताने तयार करण्यात येत असलेल्या मतदार यादीत राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त संभाव्य दोन प्रभागात नावे असणाऱ्यां मतदारांची यादी नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर तसेच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदर यादी नागरिकांना पाहण्यासाठी बार्शी नगरपरिषद कार्यालयात नोटीस बोर्डवर तसेच
या संकेतस्थळावर https://mahaulb.in/MahaULB/index उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, स्वतःचे नाव या यादीत असल्यास आपण कोणत्या प्रभागात मतदान करणार आहात, याबाबत दि. 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत नगरपरिषदेस लेखी स्वरूपात कळवावे.

निर्धारित कालावधीत उत्तर न दिल्यास संबंधित मतदारांची दोन्ही नावे “दूबार मतदार” अशी नोंद घेण्यात येईलअसे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button