उद्घाटनमहाराष्ट्ररायगड

सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्ररथाचे उद्घाटन, विविध योजनांच्या प्रचार – प्रसारासह महिला सक्षमीकरणासाठी लाभार्थ्यांना धनादेश वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध शासकीय लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन आज दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी रायगड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सदर चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, नेहा भोसले (भा.प्र.से.), वैकुंठद पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती, जिल्हा परिषद रायगड, प्रियदर्शनी मोरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA), रायगड, तसेच श्रीमती पवार, पंचायत समिती आदिवासी गण सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.500या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासात्मक उपक्रम आणि लाभाच्या योजनांची माहिती प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात येणार असून, योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण व सबलीकरण अभियान याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण व सबलीकरण अभियानांतर्गत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या अभियानांतर्गत दोन महिला बचत गट तसेच पाच वैयक्तिक लाभार्थी यांना विविध उपक्रमांसाठी धनादेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे आणि महिला व बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, लाभार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.
500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button