बार्शीमहाराष्ट्र

लायन्स क्लब बार्शी रॉयलचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न

वृक्षलागवड आणि समाजोपयोगी कार्यावर भर देणार: नूतन अध्यक्ष ला. मंगेश बागुल

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : लायन्स क्लब बार्शी रॉयलचा चालू वर्षाचा पदग्रहण सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि लायन्स परिवारातील अनेक दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार माननीय राजेंद्रजी राऊत, माजी प्रांतपाल MJF ला. प्रभुचंद्र झपके सर, ला. झपके मॅडम, VDG1 ला. डॉ. किरण खोराटे, ला. कल्याणी खोराटे, माजी प्रांतपाल व रॉयल क्लबचे मार्गदर्शक ला. जितेंद्र दोशी PMJF, ला. महेश नळे, रिजन चेअरमन ॲड. ला. अमिता कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

…तर लायन्स क्लबला सर्वतोपरी मदत करू : आमदार राजेंद्र राऊत

नूतन अध्यक्ष ला. मंगेश बागुल यांना शुभेच्छा देताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, “मंगेश बागुल हे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ असून, त्यांच्या ज्ञानाचा व मार्गदर्शनाचा फायदा काही काळापूर्वी माझ्या स्वतःच्या शेतालाही झाला आहे. आगामी काळात क्लबने समाजोपयोगी कामे करताना वृक्षलागवडीवर अधिक भर द्यावा.”500पयासोबतच लायन्स क्लबच्या कोणत्याही सामाजिक उपक्रमासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासनही आमदार साहेबांनी यावेळी दिले.

नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी

शपथविधी अधिकारी माजी प्रांतपाल ला. प्रभुचंद्र झपके सर यांनी नूतन अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीला पदाची शपथ दिली. लायन्स क्लबच्या जागतिक कार्याचा आढावा घेत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, VDG1 ला. डॉ. किरण खोराटे यांनी क्लबमध्ये प्रवेश केलेल्या नवीन सदस्यांना लायन्स परिवाराची शपथ दिली. सदस्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत त्यांनी पुढील कार्यास प्रोत्साहन दिले. कृषी आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य: ला. मंगेश बागुल

पदभार स्वीकारल्यानंतर नूतन अध्यक्ष ला. मंगेश बागुल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते स्वतः कृषी क्षेत्रात कार्यरत असल्याने, या वर्षात प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी विविध दर्जेदार आणि उपयुक्त उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.5000डॉक्टर, शेतकरी आणि सीए बांधवांचा सन्मान
याच दिमाखदार सोहळ्याचे औचित्य साधून ‘डॉक्टर दिन’, ‘शेतकरी दिन’ आणि ‘सीए दिन’ निमित्ताने बार्शीतील नामांकित डॉक्टर्स, शेतकरी आणि चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

मान्यवरांकडून शुभेच्छा आणि उपस्थिती
ला. जितेंद्र दोशी, ला. महेश नळे, ॲड. ला. अमिता कारंडे आणि ला. राहुल दोशी यांनी क्लबच्या नूतन टीमला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, ग्रोटेक परिवारातील सर्व सेल्स ऑफिसर, तिरुपती परिवारातील सर्व सदस्य, पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ला. गणेश भंडारी व ला. शितल भंडारी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नूतन सेक्रेटरी दयानंद रेवडकर यांनी मानले. बेल आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button