डॉ. प्रसन्न पवार यांच्या डेंटल क्लिनिकचे पुण्यात उदघाट्न, बार्शीच्या भूमीपुत्र डॉक्टराची गगनभरारी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दिवंगत उपजिल्हाधिकारी वसंतराव पवार यांचे नातू बार्शीचे सुपुत्र डॉ. प्रसन्न उल्हास पवार यांच्या ‘डेंट अव्हेन्यू डेंटल क्लिनिक’ या दवाखान्याचे उदघाट्न पिंपरी, पुणे येथे रविवारी ५ ऑक्टोबर रोजी आयोजित केले आहे. डॉ. प्रसन्न यांचे आई वडील देना बँकेचे निवृत्त वरिष्ठ शाखाधिकारी उल्हास पवार व आई सौ. कांचन पवार यांच्याहस्ते रविवारी ५ ऑक्टोबर रोजी सम्राट चौक, पिंपरी पुणे येथे उदघाट्न समारंभ होणार आहे.
डॉ. प्रसन्न यांनी बी. डी. एस. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथून पूर्ण केले. तर एम डी एस चे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी सर्वोपचार रुग्णालयातून पूर्ण केले. यावेळी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.
डॉ. प्रसन्न यांना बार्शीचे धन्वंतरी डॉ. बी. वाय. यादव, डॉ. एच. डी. काळे, डॉ. पुष्कराज यादव, डॉ. स्मिता यादव, डॉ. शीतल बोपलकर, डॉ. रवींद्र माळी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी उप कुलसचिव डॉ. सुधाकर बोकेफोडे, डॉ. प्रकाश बुरगुटे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. प्रसन्न यांना डॉ. अजित आव्हाड व डॉ. सारंगा बुरगुटे -आव्हाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कौटुंबिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बार्शीचे ‘सकाळ’चे बातमीदार उमेश पवार यांनी केले आहे.



