बार्शी

गुरुवारपासून कासारवाडी येथे सिताराम महाराज समाधी सोहळा सुरू

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील सच्चिदानंद श्री सद्गुरू सिताराम महाराज मंदिर कृष्णाई नगर येथेे श्री सद्गुरू सिताराम महाराज समाधी उत्सव सोहळा परमपूज्य गुरुमाऊली सौ. लक्ष्मीबाई कदम यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवार दि. 25 नोव्हेंबर पासून ते गुरुवार दि. 2 डिसेंबर पर्यंत भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत कलस, पादुका, ग्रंथ ,विना, टाळ-मृदुंग, ध्वज यांचे पूजन करून ज्ञानयज्ञ व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होणार आहे.शुक्रवार दि .26 नोव्हेंबर ते गुरुवार दि. 2 डिसेंबर पर्यंत सायंकाळी साडेसहा ते रात्री साडे नऊ पर्यंत मराठी मधून भव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथा कथाप्रवक्ते प.पू . भागवताचार्य डोंगरेजी महाराज, कृपांकित महाराष्ट्राचे श्रद्धास्थान विदर्भरत्न प.पू. वेदांताचार्य बालयोगी गोपालजी महाराज कारखेडकर वाशिम यांच्या अमृततुल्य दैवी रसाळ वाणीतून कथा वाचन होणार आहे यामध्ये दैनंदिन पहाटे चार ते सहा काकड आरती सहा ते सात विष्णुसहस्त्रनाम सकाळी सात ते अकरा पारायण अकरा ते एक गाथा भजन एक ते तीन भोजन तीन ते पाच सामुदायिक जप व भजन पाच ते साडे सहा हरिपाठ साडेसहा ते साडेनऊ भागवत कथा आकारा ते चार हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होऊन बुधवार दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सिताराम महाराज मंदिर ते श्री स्वामी समर्थ मंदिर दिंडी मिरवणूक आहे तसेच गुरुवार दिनांक 2 डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता सद्गुरू श्री सिताराम महाराजांचा समाधी उत्सव होऊन दुपारी बारा वाजता ज्ञानेश्वरी महाराज समाधी उत्सव व काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादचा कार्यक्रम होईल या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे तसेच हा सोहळा सर्व कोरोनाचे नियम पाळुन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button