बार्शीमहाराष्ट्र

बार्शीच्या सुयश विद्यालयामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : ऑक्टोबर रोजी पुर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, शिक्षण सहसंचालक अरुण ठाकरे, शिक्षण सहसंचालक सुरेश कुलकर्णी, शिक्षण सहसंचालक वैजनाथ खांडके, शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुयश विद्यालयांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण विभागात सेवा केलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी होऊन समक्ष हितगुज होऊन परस्परांतील स्नेह वृद्धिंगत व्हावा याकरिता या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदरच्या कार्यक्रमासाठी शिक्षण संचालक शिक्षण सहसंचालक शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी तसेच उपशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुयश विद्यालयाचे संस्थापक व कार्यक्रमाचे आयोजक शिवदास नलावडे यांनी केले. सध्याच्या धकाधकीच्या युगात एकमेकांशी संवाद साधत जुन्या आठवणीत रमत सर्वांनी आपली सेवानिवृत्तीनंतरची दिनचर्या एकमेकांसोबत शेअर केली. बऱ्याच काळानंतर एकमेकांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेच्या मार्गदर्शिका प्रतिभा नलवडे, मुख्याध्यापक सागर मंडलिक, पर्यवेक्षिका श्रीमती सुरवसे, श्रीमती गवळी, श्रीमती मोरे, श्रीमती साखरे, सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button