आंदोलनसोलापूर

31ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या आधारशी ई-केवायशी करा

पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : पी एम किसान लाभार्थी ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड ई के वाय सी जोडून घेतले नाही अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड ई के वाय सी जोडून घ्यावी अन्यथा प्रधानमंत्री किसान योजनेतून आपल्याला लाभ मिळणार नाही असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी केले आहे.
पी एम किसान योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टल वर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ईकेवायसी करण्यासाठी यापूर्वी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आलेली आहे .मात्र तरीही बरेच शेतकरी यांनी ईकेवायसी केलेली नसल्याचे दिसून येत आहे. ई के वा य सी करण्यासाठी ओटीपी व बायोमेट्रिक हे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेच्या www.pmkissan.gov.in या वेबसाईटवर फार्मर कॉर्नर या टॅब मध्ये किंवा पीएम किसान या app द्वारे ओटीपी प्राप्त करून लाभार्थी स्वतः ई केवायसी प्रमाणीकरण मोफत करू शकतात. तसेच ग्राहक सेवा केंद्र म्हणजेच सीएससी सेंटरवर बायोमेट्रिक पद्धतीने ई केवायसी प्रमाणीकरण करता येणार आहे. पी एम किसान योजना अंतर्गत यापुढील लाभ मिळण्यासाठी ई केवायसी प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे या योजनेची ई केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button