बार्शीमहाराष्ट्रसण

लायन्स क्लब ने साजरी केली वृद्धाश्रमातल्या वृद्धांसोबत राखी पौर्णिमा

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : लायन्स क्लब बार्शी रॉयल ने सहारा वृद्धाश्रम मुक्काम पोस्ट गौडगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील सध्या उपळे दुमाला येथे सुरू असलेल्या राहुल भड यांच्या वृद्धाश्रमातल्या उपक्रमाला भेट देऊन वृद्धाश्रमातल्या वृद्धांसोबत राखी पौर्णिमेचा सण साजरा करून त्या वृद्धांना पुरणपोळीचे गोड जेवण पण जीव घालून हा सण साजरा केला जेवणाच्या मेजवानीसाठी सेक्रेटरी लायन दयानंद रेवडकर यांनी देणगी स्वरूपात रोख रक्कम दिली.500लायन्स क्लब बार्शी रॉयल नेहमीच असे नवीन नवीन उपक्रम राबवत असते या आश्रमात साधारणता 19 ते 20 वृद्ध सध्या राहतात राहुल भड त्यांच्या आरोग्यापासून त्यांच्या जेवणापर्यंत राहण्यापासून सगळीच व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने काळजीपूर्वक करत आहेत वृद्धाश्रमात अतिशय नीटनेटके पणा व स्वच्छता दिसून येते या आश्रमातील सगळे वृद्ध अतिशय प्रेमाने एकमेकाला मदत करून आपले जीवन जगत आहे त्यांचे जेवन बनवण्यासाठी अर्चनाताई संकपाळ या मदत करत असतात.

उपळे दुमाला नागोबाची वाडी गौडगाव सारख्या गावातून सगळे गावकरी या आश्रमाला लागेल ती मदत करत असतात
राहुल भड यांचे वृद्धाश्रमाचे बांधकाम नागोबाच्या वाडी येथे सुरू आहे कोणाला जर काही त्यांना मदत करायची असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असे त्यांनी विनंती केलेली आहे
या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते
.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button