पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

युवा उद्योजक सुरज ठोंबरे यांना एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीची यावर्षीची भारतातील मानाची ‘सी.एम.डी. ट्रॉफी’प्रदान”

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शीतील के टी ट्रॅक्टर्स परिवारातील कुबोटा ट्रॅक्टर चे धाराशिव येथील वितरक धाराशिव ट्रॅक्टर्सला एस्कॉर्ट्स कुबोटा ट्रॅक्टर कंपनीकडून ‘सी.एम.डी. ट्रॉफी’ देऊन सन्मानित करण्यात आले. हरियाणातील गुरुग्राम येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात सूरज ठोंबरे यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.500000एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीकडून दरवर्षी देशभरातील 350 डीलर्सपैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विक्रेत्यांना विविध निकषांवर आधारित पुरस्कार दिले जातात. यामध्ये धाराशिव ट्रॅक्टर ने यंदा विक्री वाढ, ग्राहक समाधान, सेवा व सपोर्ट, प्रशिक्षित मनुष्यबळ, व तत्काळ स्पेअर पार्ट उपलब्धता यासारख्या महत्त्वपूर्ण मापदंडांवर बाजी मारत ही मानाची सीमडी ट्रॉफी पटकावली.

कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निखिल नंदा, उपव्यवस्थापकीय संचालक सेजी फुकुओका, ट्रॅक्टर व्यवसाय विभागाचे मुख्य अधिकारी गुरमीतसिंग ग्रेवाल, पूर्णवेळ संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी भारत मदान, मुख्य अधिकारी, कॉर्पोरेट नियोजन विभाग अकिरा काटो या मान्यवरांच्या हस्ते ही ट्रॉफी प्रदान करण्यात आली.या सोहळ्याला देशभरातील सर्व एस्कॉर्ट्स कुबोटा ट्रॅक्टरचे अधिकृत डीलर्स उपस्थित होते.

सुरज ठोंबरे म्हणाले, “सातत्य, जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर हे यश मिळवता आले. माझ्या संपूर्ण टीमने आपल्या शोरूमला स्वतःचे समजून दिलेल्या सेवेचे हे फळ आहे. कंपनीचे अधिकारी सहयोगी उपाध्यक्ष आशुतोष देशमुख, झोनल सेल्स मॅनेजर सचिन राजमाने, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक जितेंद्र तांबारे व क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक गणेश पाटकुलकर यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शनही आमच्यासाठी मोलाचे ठरले.” अशी भावना सूरज ठोंबरे यांनी व्यक्त केली.

तसेच ग्राहकांना तत्पर सेवा, अनुभवी मेकॅनिक, उपलब्ध स्पेअर पार्ट्स व उत्तम सेवा नीतिमत्तेच्या जोरावरच आम्ही ग्राहकांचे मन जिंकू शकलो आहोत, असेही त्यांनी नमूद केले.सुरज ठोंबरे हे बार्शीतील प्रसिद्ध उद्योजक संतोष ठोंबरे यांचे पुतणे असून, अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्यकौशल्याने उद्योग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button