रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडी मुंबई अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची अधिकृत नियुक्ती – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई दि.26 : रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदी निवड होताच सोहेल शेख यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची भेट घेऊन आर्शिवाद घेतले.
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अल्पसंख्यांक आघाडीचे नवनियुक्त अध्यक्ष सोहेल शेख हे जोगेश्वरीतील रिपब्लिकन पक्षाचे तरुण क्रियाशील कार्यकर्ते आहेत.दलित मुस्लिम एकता परिषदेतुन सोहेल शेख यांनी जोगेश्वरीत चांगले शक्तीप्रदर्शन घडवले आहे.रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातुन ते मुंबईत चांगले सामजिक कार्य करित आहेत.
रिपब्लिकन पक्षात एकनिष्ठ राहुन केलेल्या चांगल्या कामामुळे सोहेल शेख यांच्यावर रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी अधिकृतरित्या सोपवण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइं चे अल्पसंख्यांक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुश्ताक बाबा यांनी सोहेल शेख यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान केले आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अल्पसंख्यांक आघाडीच्या अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल सोहेल शेख यांनी पक्षाध्यक्ष ना.रामदास आठवले,सौ. सिमाताई आठवले, अविनाश महातेकर, गौतम सोनावणे, रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,बाळासाहेब गरुड, विवेक पवार,वकार खान, प्रकाश जाधव,मुश्ताक बाबा,रमेश गायकवाड, अजित रणदिवे, संजय पवार, संजय डोळसे, अमित तांबे, हसन शेख, रतन असवारे आदी नेत्यांचे आभार मानले आहेत.
मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नवनियुक्त मुंबई प्रदेश रिपाइं अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष सोहेल शेख यांचे अभिनंदन केले आहे.



