शिवसेना (उ.बा.ठा. गट ) तालुका प्रमुख विनोद नाना वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शिवसेना प्रमुख स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वाचा आधार घेतं वाढदिवस हा सामाजिक बांधिलकी सांभाळत वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना तालुका प्रमुख विनोद नाना वाणी यांनी रक्तदान शिबीर आयोजित करत वाढदिवस साजरा केला.
सदर रक्तदान शिबिराचे उदघाट्न स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जेष्ठ शिवसैनिक नवनाथ चोबे,जेष्ठ शिवसैनिक सुरेश मोरे, शिवदूत पांडुरंग गपाट,शिवदूत राजाभाऊ पाटील,युवासेना राज्य सहसचिव उषा पवार, बंडू काका वाणी यांच्या हस्ते करण्यात आलें. सदर शिबिरात 139 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
शिबीर संपन्न करण्यासाठी राज्य विस्तारक हेमंत रामगुडे, युवा सेना सोलापूर जिल्हा सचिव दिपक तिवाडी, युवासेना बार्शी विधानसभा प्रमुख विशाल वाणी, शिवदूत गणेश खडके, बाळराजे जाधव, गणेश शिंदे, युवासेना समन्वयक पांडुरंग घोलप यांच्या सह युवासैनिक व भैय्यासाहेब वाणी मित्र परिवाराने परिश्रम घेतले.




