बार्शीमहाराष्ट्र

कंडक्टर सागर कुटे यांचा प्रामाणिकपणा आणि पोलिसांची तत्परता ; हरवलेली बॅग लॅपटॉप व मोबाईल मालकाच्या ताब्यात

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : हरवलेली बॅग, त्यात असलेला लॅपटॉप आणि मोबाईल… प्रवाशाची चिंता ओळखून एकीकडे एसटी कंडक्टर सागर विष्णू कुटे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा, तर दुसरीकडे बार्शी शहर पोलिसांनी दाखवलेली तत्परता यामुळे पुण्याचे रहिवासी अमित शिवाजी हाजगुडे यांची हरवलेली बॅग अखेर सुखरूप परत मिळाली.5000अमित हाजगुडे हे एसटीने प्रवास करत असताना त्यांची बॅग चुकून बसमध्ये राहून गेली होती. बॅगमध्ये लॅपटॉप, मोबाईल आणि इतर महत्त्वाच्या वस्तू होत्या. ही बॅग सापडताच कंडक्टर सागर कुटे यांनी कोणतीही विलंब न करता संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

दरम्यान, बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन काढून बॅगेचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. अखेर पोलिसांच्या शर्तीच्या प्रयत्नांना आणि सागर कुटे यांच्या प्रामाणिक वर्तनाला यश आले.

या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी एसटी कंडक्टर सागर कुटे यांचा विशेष सत्कार केला. ही घटना प्रामाणिकपणाचा आणि पोलिसी दक्षतेचा एक प्रेरणादायी आदर्श ठरली आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button