पंढरपूरप्रशासनमहाराष्ट्रसोलापूर

आषाढी वारीसाठी AIची साथ; पंढरपुरातील इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल रूमची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल रूमची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)च्या साहाय्याने वारीतील प्रत्येक घडामोडीवर २४ तास बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती देण्यात आली.500 आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून, वारकऱ्यांना सुरक्षित, सुव्यवस्थित आणि निर्भय वारीचा अनुभव मिळावा यासाठी प्रशासन प्रभावीपणे कार्यरत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. या पाहणीवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे तसेच वरिष्ठ पोलीस व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.509

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button