बार्शी

शिवसेना युवासेना विद्यार्थी सेना , पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात सायकल रॅली काढून निषेध

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी शिवसेना युवासेना विद्यार्थी सेना यांच्या वतीने केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच मा खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हा प्रमुख गणेश दादा वाणकर, युवा सेना जिल्हा प्रमुख महेश देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली बार्शी शहर तालुका शिवसेनेच्या वतीने बार्शी नगरपालिके पासून मुख्य बाजारपेठेतुन तहसील कार्यालया पर्यंत सायकल रॅली काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख प्रवीण काकडे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख पांडुरंग घोलप, सोमनाथ इंगळे, ग्राहक सेनेचे शहर प्रमुख विजय माने, शैलेश माने, हेमंत रामगुडे, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष आनंद काशीद, शोएब सय्यद, जिवन काकडे, ज्योतीराम यादव, बालाजी जाधव, योगेश मुळे यांच्या सह विविध पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button