बार्शीमहाराष्ट्र

बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पीटलला धर्मादाय रुग्णालय नियमांचे पालन करण्याचे निर्देश

पालन न केलेस कारवाई करण्याचा इशारा

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील जगदाळे मामा हॉस्पीटल या धर्मादाय रुग्णालयाबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सोलापूर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. धर्मादाय उप आयुक्त, सोलापूर यांच्या ९ जुलै २०२५ रोजीच्या आदेशानुसार, निरीक्षक चौकशी क्रमांक ०५/२०२५ च्या अहवालानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.5000रुग्णालयाने उच्च न्यायालय, मुंबई यांनी मंजूर केलेल्या योजनेचा फलक सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावा, असे निर्देशात नमूद आहे. तसेच, निर्धन आणि दुर्बल घटकांतील रुग्णांना आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर तात्काळ उपचार द्यावेत आणि अत्यावश्यक परिस्थितीत कागदपत्रे सादर करण्यास सवलत द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, रुग्णालयात आरोग्य मित्र आणि वैद्यकीय समाजसेवक यांचे संपर्क क्रमांक असलेला फलक लावून रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्याची सूचना देण्यात आली आहे.

रुग्णालयाच्या आवारात रुग्णाच्या नातेवाइकाच्या एका वाहनाला पार्किंग शुल्क आकारू नये आणि जास्तीत जास्त पात्र रुग्णांना धर्मादाय योजनेचा लाभ मिळावा याची दक्षता घ्यावी, असेही निर्देशात म्हटले आहे. या निर्देशांची पूर्तता करून अनुपालन अहवाल त्वरित सादर करण्यास सांगितले असून, तसे न केल्यास महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button