उद्घाटनबार्शीमहाराष्ट्र

माधवबाग बार्शी शाखेचा स्ववास्तूमध्ये स्थलांतर व उद्घाटन सोहळा रविवारी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : माधवबाग बार्शी शाखेचा स्ववास्तूमध्ये स्थलांतर व उद्घाटन सोहळा येत्या रविवारी दिनांक 13 जुलै रोजी सकाळी दहा वाजता शहरातील कुर्डूवाडी रस्त्यावरील बाळेश्वर नाक्या नजीक असलेल्या छत्रपती कॉलनी येथे संपन्न होत असल्याची माहिती बार्शी माधवबागचे डॉ.पवन कोळी व डॉ.क्रांती कोळी यांनी दिली.50000हा उद्घाटन सोहळा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव व डॉ. मीरा यादव यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. माधवबागच्या या स्ववास्तूमधील स्थलांतर सोहळ्याला आय एम ए चे अध्यक्ष डॉ. सुधीर बकरे, निमाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जाधव, होमिओपॅथिक असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. राहुल ताटे, डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रमोद जाधवर माधवबागचे डॉ. सचिन पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

माधवबाग ही हृदयरोग, डायबेटिस, हायपरटेन्शन, ओबेसिटी इ विकारांवर विनाशस्त्रक्रिया रिसर्च आणि इव्हिडन्स बेस्ड उपचार करणारी जगातील अग्रगण्य हार्टकेअर इन्स्टिट्यूट असून २००८ साली वैद्यकिय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. कोळी यांनी पुणे व बार्शी येथील नामांकित हॉस्पिटलसोबत माधवबागच्या खोपोली व पुणे या ठिकाणी सेवा दिली.

२०१४ साली माधवबाग बार्शी शाखेची स्थापना करून पंचकर्म व डायट बॉक्सच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले.२०१८ साली माधवबाग धाराशिव शाखेची सुरुवात करून डॉ. पवन कोळी यांनी २०२४ पर्यंत असंख्य रुग्णांची प्रामाणिक सेवा केली.

१० वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेला कुशल व प्रशिक्षित स्टाफ ,सुसज्ज, स्वतंत्र पुरुष व महिला विभाग, स्ट्रेस टेस्ट, ABPM सारख्या अत्याधुनिक तपासण्या येथे उपलब्ध असून आजपर्यंत उत्तम रुग्णसेवेसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले हे क्लिनीक आहे. या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे अशी आवाहन डॉ. पवन कोळी यांनी केले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button