बार्शी तालुक्यातील नागरिकांना पुरवठा विभागाचे शिधापत्रिकेबाबत अवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की तहसील कार्यालय पुरवठा विभागामध्ये नागरिकांना प्राधान्य योजनेतून शिधापत्रिकेत समाविष्ट करण्यासाठी अर्ज प्राप्त झालेले होते. त्यानुसार सदर अर्जाची पडताळणी करून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम२०१३ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्राधान्य या योजनेत समाविष्ट झालेले आहेत.
सदर शिधापत्रिकाधारक यांचे शिधापत्रिका प्राधान्य या योजनेत आरसीएम प्रणाली द्वारे ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे त्या अर्जदारांना ऑनलाइन प्रिंट देण्यात येणार आहे. शासनाकडून आता पुस्तिका शिधापत्रिका बंद करण्यात आलेली आहे. तरी बार्शी तालुक्यातील ज्या नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांना ऑनलाइन प्रिंट देण्यात येणार आहे.
बार्शी तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीने पुस्तिकी शिधापत्रिका बाबत गैरप्रकार केला असे आढळून आल्यास त्या व्यक्तीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच बार्शी तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे प्राधान्य योजनेत शिधापत्रिका समाविष्ट करण्याबाबतचे अर्ज कोणत्याही एजंट जवळ देऊ नयेत असे अर्ज प्रत्यक्ष तहसील कार्यालय पुरवठा विभागात सादर करावेत असे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



