धार्मिकपुणेमहाराष्ट्र

भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी सुरु;दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

पुणे, दि. १५ : भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी सुरु झाले असून मंदिरात प्रतिदिन एक हजार भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या https://shreebhimashankar.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पास उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर होणार असून दर्शनाकरिता पास अनिवार्य करण्यात आल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.5000

भाविकांना ३० जून २०२६ पर्यंत दररोज सकाळी ७ ते ११ वा. दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे.

सन 2027 मधील नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज महाकुंभ 2025 च्या अनुभवाच्या आधारे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. संभाव्य वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.5000कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नवीन सभामंडप व पायरी मागचि काम सुरु असल्याने, देवस्थान ट्रस्टने ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सदर बंद कालावधीस ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे काम पूर्ण करण्यासाठी सामान्य परिस्थितीत सुमारे एक वर्षाचा कालावधी अपेक्षित होता. तथापि, भिमाशंकर संस्थान, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक यांच्या सहकार्यामुळे तसेच रात्रंदिवस अखंड काम सुरु ठेवण्यात आल्याने हे काम केवळ पाच महिन्यांत पूर्णत्वास येत आहे.

मुख्य सभामंडपाचे काम पूर्ण करण्यात आले असून दर्शनबारी उभारणी, परिसर स्वच्छता, भाविकांसाठी सुविधा व गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत कामे पूर्ण झाली आहे. सर्व कामे अंतिम टप्प्यात असून उर्वरित किरकोळ कामे जलदगतीने पूर्ण करुन बांधकाम साहित्य, दगड व यंत्रसामग्री हटवून परिसर भाविकांसाठी मोकळा करण्याच्यादृष्टीने श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांनी आजपासून दर्शनाकरिता खुले करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button