आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते बार्शी शहरात ६ कोटी, ३५ लाख, ४९ हजार, ६४१ रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

B1न्यूज नेटवर्क मराठी
बार्शी शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील १ कोटी, ९६ लाख, ५२ हजार, ६४९ रुपये किंमतीची विकास कामे, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक १५ मधील ७५ लाख, ६० हजार, १६३ रुपये किंमतीची विकासकामे व प्रभाग क्रमांक २० मधील ३ कोटी, ६३ लाख, ३६ हजार, ८२९ रुपये अशा एकूण ६ कोटी, ३५ लाख, ४९ हजार, ६४१ रुपये किंमतीच्या रस्ते, गटारी आदी विकासकामांचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ राऊत व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे मालक, सुधीर बापू बारबोले, नगरसेविका सौ.कुसुमताई सुर्वे, श्रीमती शोभाताई मोरे, सौ. मनिषाताई पोफळे, नगरसेवक मदन गव्हाणे, शरद काका फुरडे, कुमार डमरे, धनू मोरे, रमाकांत सुर्वे, राजाभाऊ पोफळे, स्थानिक नागरिक बंधू-भगिनीं उपस्थित होते.