सरपंच परिषद राज्यात आदर्श काम करत आहे – आमदार बबनदादा शिंदे

B1न्यूज मराठी नेटवर्क
आदर्श सरपंच गावांना मिळणार लाखो रुपयाचा विशेष निधीमाढा : सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे प्रदेश सरचिटणीस ॲड विकास जाधव व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत.तसेच सरपंच उपसरपंच यांना एकत्र आणून त्यांचे हक्क अधिकार यांची जाणीव करून देत आहेत. सरपंच परिषदेचे काम उत्कृष्ट असून सर्वांनी एकत्र येऊन काम करत राहण्याची गरज आहे. असे उद्गार माढयाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा तालुका सरपंच परिषदेच्या मेळाव्यात काढले.
यावेळी आमदार शिंदे म्हनालेकी,आदर्श कामाबद्दल माढा पंचायत समितीचे वतीने दोन महीला व दोन पुरुष यांना आदर्श सरपंच पुरस्कार दरवर्षी देण्यात येणार व त्यांच्या गावांना दहा व सात लाख रुपये आमदार निधी देण्यात येईल. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र माढा तालुक्यातील पदाधिकारी निवडी केल्या तसेच आढावा बैठक घेतली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशसरचिटणीस ॲड विकास जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बबनदादा शिंदे होते यावेळी प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे हे नांदेड जिल्हा दौ-यावर होते त्यांनी नुतन पदाधिकारी यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख पश्र्चिम महाराष्ट्र महीला उपाध्यक्ष कौसरताई जहागिरदार महीला जिल्हा अध्यक्ष कविता घोडके पाटील राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष सुप्रिया गुंड पाटील सरपंच परिषद माढा तालुका अध्यक्ष ॲड धनंजय बागल , शिवशंकर ढवण , पंडित खारे नुतनमहीला तालुका अध्यक्ष रुपाली नवले यांच्या सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते माढा तालुक्यातील सरपंच उपसरपंच बहुसंख्येने उपस्थित होते.
सरपंच परिषदेचे महत्व वाढत आहे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही एकमेव सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हक्क, अधिकार प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक ग्रामविकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आहे पुढील काळात संघर्ष करावा लागणार आहे, त्यासाठी आम्ही तयार आहोत. ( ॲड विकास जाधव प्रदेश सरचिटणीस सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र )