मदतमहाराष्ट्रमुंबईवनविभाग

वनसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखत तयारीसाठी आर्टीतर्फे आर्थिक सहाय्य

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘वनसेवा मुख्य परीक्षा-२०२४’ उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या मातंग व त्यातील तत्सम उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत १० हजार रुपये आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना १० हजारांचे एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.

मुलाखतीची तयारी अधिक प्रभावीपणे करता यावी आणि उमेदवारांवरील आर्थिक ताण कमी व्हावा, हा आर्थिक सहाय्य या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.

या संदर्भातील सविस्तर जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ‘आर्टीच्या’ अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी:

उमेदवारांनी ‘आर्टी’च्या http:// https://arti.org.in या संकेतस्थळाला भेट देवून NOTICE BOARD या लिंकवर तपशील पहावा, तसेच अर्ज भरण्यासाठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button