जयंतीबार्शीमहाराष्ट्र

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बार्शीत भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : यशराज बहुउद्देशीय व संशोधन संस्था, बार्शी यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी भव्य ‘जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मातृमंदिर मंगल कार्यालय, ढगे मळा, कुर्डुवाडी रोड, बार्शी येथे सकाळी ९:०० वाजता पार पडणार आहे.50000विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि महापुरुषांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एकूण तीन गटांत घेतली जाणार असून त्यासाठी खालीलप्रमाणे विषय निश्चित करण्यात आले आहेत.
स्पर्धेचे गट आणि विषय
१. ५ वी ते ७ वी गट:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य
म. ज्योतिबा फुले यांचे जीवनकार्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण आणि शिक्षण
5000२. ८ वी ते १० वी गट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारताच्या संविधानाचे शिल्पकार
म. ज्योतिबा फुले यांचे जीवन व स्त्री शिक्षणातील योगदान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैयक्तिक व सामाजिक जीवन
म. ज्योतिबा फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य
50000३. ११ वी व पुढील (खुला गट)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आधुनिक भारत
म. ज्योतिबा फुले एक आद्य क्रांतीकारक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्म
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्राचा पाया
बक्षिसांचे स्वरूप (प्रत्येक गटासाठी)
विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह (ट्रॉफी), प्रमाणपत्र आणि पुस्तके देऊन गौरविण्यात येणार आहे.
5000प्रथम क्रमांक: रु. १५०१/- (रु. ५०० ची पुस्तके + रु. १००१ रोख)
द्वितीय क्रमांक: रु. ७०१/- (रु. २०० ची पुस्तके + रु. ५०१ रोख)
तृतीय क्रमांक: रु. ५०१/- (रु. २०० ची पुस्तके + रु. ३०१ रोख)
5000स्पर्धेचे नियम व नोंदणी : प्रत्येक स्पर्धकासाठी वेळ ५+२ मिनिटे असेल. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ५० रुपये आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२६ पर्यंत आहे.बक्षीस वितरण त्याच दिवशी दुपारी ४:०० वाजता संपन्न होईल.5000अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी कबाडे सर (९८५०८५८१६२), अमृता रंगदाळ (९०७५९२७१४३) किंवा विलास शिंदे (९६०४२२००३६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन यशराज बहुउद्देशीय व संशोधन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button