महाराष्ट्रसोलापूर

संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने स्वागत

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि. 28 : श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यामध्ये शनिवार दि.28 जून 2025 रोजी आगमन झाले असून सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुलदीप जंगम यांनी स्वागत केले. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते.50000

सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव हद्दीत संत गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष कुमार,कासेगाव सरपंच यशपाल वारकर, उळे गाव सरपंच श्रीमती अंबिका कोळे उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी वारकऱ्यांना आरोग्य किट देऊन पालखीचे स्वागत केले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button