कृषीनागपूरप्रशासनमहाराष्ट्र

जिल्ह्यात १६,हजार ५७३ मे.टन युरिया आणि ३,हजार १५८ मे. टन डीएपी शिल्लक जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध

५,२५० मे. टन युरिया आणि १,३५५ मे.टन डीएपी बाफर साठा, डीएपी खतास पर्यायी खत म्हणून युरिया आणि एसएसपी खताचा वापर करण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

अफवांवर विश्वास न ठेण्याचे रासायनिक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे यांचे आवाहन

नागपूर : जिल्ह्यात मागणीनुसार युरिया आणि डीएपीचा साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील १ हजार ५२२ परवानाधारक कृषी सेवा केंद्रात रासायनिक खत उपलब्ध असल्याची माहिती शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी दिल्ली.

जिल्ह्यात खरीप हंगामाकरीता एप्रिल मे जून या ३ महिन्याकरीता २४,हजार ५६४ मेट्रिक टन युरिया आवंटीत असून ३४,हजार ५१३ मेट्रिक टन युरिया प्राप्त झालेला आहे. त्यापैकी १७, हजार ९४० मेट्रिक टन युरियाची पॉस मशीनद्वारे शेतकरी बांधवांनी खरेदी केला आहे. १६,हजार ५७३ मेट्रिक टन युरिया पॉस वर शिल्लक आहे. महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ आणि विदर्भ कोऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या गोडाऊन मध्ये ५,हजार २५० मेट्रिक टन युरिया संग्रहित (बफर) करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे युरियाची जिल्ह्यात टंचाई नाही.5000खरीप हंगामाकरीता एप्रिल मे जून या तीन महिन्याकरीता १२,हजार ५४६ मे टन डीएपी आवंटीत असून आज अखेर १०,९४७ मेट्रिक टन डीएपी प्राप्त झालेला आहे. त्यापैकी ७,हजार ७८९ मेट्रिक टन डीएपीची पॉस मशीनद्वारे शेतकरी बांधवांनी खरेदी केली असून ३,हजार १५८ मेट्रिक टन डीएपी पॉस वर शिल्लक आहे. तसेच महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ आणि विदर्भ कोऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या गोडाऊन मध्ये १,हजार ३५५ मे. टन डीएपी संग्रहित (बफर) करून ठेवण्यात आला आहे. 50000आखाती युद्धामुळे डीएपी खताची आवश्यकतेप्रमाणे उपलब्धता होण्यास या वर्षी अडचणी येणार असल्याने शेतकरी बांधवांनी डीएपी खतास पर्यायी खत म्हणून १ बॅग डीएपी ऐवजी अर्धा बॅग युरिया आणि ३ बॅग एसएसपी खत किवा अर्धा बॅग युरिया आणि १ बॅग टीएसपी खताचा पर्यायी खत म्हणून वापर करावा तसेच खत टंचाईच्या अफवावर विश्वास न ठेवता खत खरेदीकरिता घाई करू नये असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी केले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button