मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य’चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील विशेषांक प्रकाशित

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित या प्रकाशनाप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि ‘लोकराज्य’चे मुख्य संपादक तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली या अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. अंकाच्या मुखपृष्ठावर अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्ताने तयार करण्यात आलेले बोधचिन्ह आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे महाराष्ट्रातील कार्य, धर्मपरायणता, समाजकार्य, राज्यकारभाराचा आदर्श, दातृत्व, तसेच त्यांनी उभारलेल्या विविध वास्तूंची माहिती अंकात देण्यात आली आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी लिहिलेले लेख अंकात समाविष्ट आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसह शासनाने जन्म त्रिशताब्दी निमित्त घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहितीदेखील या अंकात देण्यात आली आहे.

अंकाच्या प्रकाशन प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर, मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डीले, सुरेश धस, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, अमोल खताळ, माजी मंत्री आण्णा डांगे, बबनराव पाचपुते, स्नेहलता कोल्हे, रमेश शेंडगे, प्रा.लक्ष्मण हाके, जिल्हाधिकारी डॉ.पकंज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या