पंढरपूरप्रशासनमहाराष्ट्रसोलापूर

आषाढी वारी २०२६ : पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून अत्याधुनिक ड्रोनची तैनाती

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर, पंढरपूर दि. २० : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा सुरक्षित, सुरळीत व शिस्तबद्ध पार पडावा यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पालखी मार्गावर अत्याधुनिक ड्रोनची तैनाती करण्यात आली.

धर्मपुरी सीमेपासून नातेपुतेपर्यंतच्या पालखी मार्गावर ड्रोनद्वारे सातत्याने निगराणी ठेवण्यात आली. या माध्यमातून पालखी सोहळ्याची परिस्थिती, वारकऱ्यांची हालचाल तसेच मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. त्यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देणे शक्य झाले.500याशिवाय पालखी मार्गावरील वाहनांची होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही ड्रोनचा प्रभावी वापर करण्यात आला. ज्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होत असल्याचे निदर्शनास आले, त्या ठिकाणी नियंत्रण कक्षातून संबंधित पोलिसांना तत्काळ सूचना देऊन वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे पालखी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यास मोठी मदत झाली. 500अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पालखी सोहळा अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने प्रभावी नियोजन केले असून, जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या पालखी सोहळ्यादरम्यान ही व्यवस्था यशस्वीपणे राबविण्यात आली.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button