डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहु संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहु संस्थेच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कर्मवीर थाळी, शिवाजी नगर, बार्शी जि सोलापूर येथे सकाळी 9 ते दुपारी 1वाजेपर्यंत हे शिबिर संपन्न झाले. या शिबिरात विविध वैद्यकीय तपासण्या आणि समुपदेशन मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. आर व्ही जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आरोग्य जागरूकतेचे महत्त्व विशद करत सर्वांनी नियमित तपासणी करावी, असे आवाहन केले. शिबिरात हृदयरोग, मधुमेह, कोलेस्ट्राल, रक्तदाब तपासणी, थायरॉईड व कॅन्सर यासारख्या तपासणी सुविधा उपलब्ध होत्या. तसेच, मोफतऔषध व गोळ्या याचाही समावेश होता.
डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्थचे अध्यक्ष सुरेश राऊत म्हणाले, “आमचा उद्देश समाजातील सर्व स्तरांतील लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या शिबिरातून सुमारे 101 नागरिकांनी लाभ घेतला.” शिबिरात डॉ. आर व्ही जगताप व डॉ. बारबोले साहेब यांनी वैद्यकीय सेवा पुरवल्या. या शिबिराला स्थानिक नागरिक, विशेषतः वृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील व्यक्तींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. अनेकांनी शिबिराच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.
सदर आरोग्य शिबीर आयोजन आणि नियोजन यासाठी डॉ सुनिता सुधाकर बांगर ( तालुका आरोग्य अधिकारी ) यांनी सहकार्य केले. सदर आरोग्य शिबिरचे आयोजन व नियोजन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश राऊत,तसेच संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत गोडगे व संस्थेचे सचिव सतीश राऊत, संस्थेचे सहसचिव संतोष कुमार गुजरे, संस्थेचे खजिनदार गुणवंत खांडेकर यांनी सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे संस्थेचे सभासद नंदकुमार जगदाळे, प्रा सुनील (बापू) शेळके, अँड.काकासाहेब गुंड, प्रा श्रीपाद भंडारी, राजाभाऊ इंगोले , कल्याण तांबे, बलभीम माळी, निलेश मोहिते यांनी सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
व्यवस्थापक मंडळ म्हणून बी.टी. शिंदे सर, जगन्नाथ भाऊ साळुंखे, प्रकाश नेवरे, प्रदिप शिंदे, भाऊसाहेब गोडगे, आकाश राऊत, दर्शन धावणे, प्रतिक शिंदे, ओंकार गवळी, कमलाकर घोडेकर, संग्राम गोडगे, अभिषेक राऊत यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष प्रा सुरेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्रीपाद भंडारी सर यांनी केले तर आभार सतीश राऊत सर यांनी मानले.