21 ते 23 मार्च दरम्यान वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा

0

नामांकित व्हॉलीबॉलपटूंचा खेळ बघण्याची क्रीडाप्रेमींना नामी संधी

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी मुंबई : महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दि. 21 ते 23 मार्च 2025 रोजी वाशीमध्ये ‘नवी मुंबई महानगरपालिका चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा 2024 – 25’ चे आयोजन करण्यात आलेले असून या माध्यमातून राज्यातील नामांकित व्हॉलीबॉल संघ आपले कौशल्य प्रदर्शित करणार आहेत.

महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आणि नवी मुंबई ॲमॅच्युअर व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी यांच्या सहयोगाने संपन्न होणा-या या 3 दिवसीय स्पर्धेत 16 पुरूष व 8 महिला संघांतील अत्यंत नामवंत व राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असणा-या खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी नवी मुंबईकरांना प्राप्त होणार आहे.

या स्पर्धा शुक्रवार, दि. 21 मार्च पासून रविवार, दि. 23 मार्च, 2025 पर्यंत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (मॉडर्न कॉलेज), वाशी येथे संपन्न होणार असून स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह तसेच वैयक्तिक सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाही विशेष पारितोषिके व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवार, दिनांक २१ मार्च २०२५ रोजी, सायं. 6 वा. तसेच पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. 23 मार्च 2025 रोजी, सायं. 7 वा. संपन्न होणार आहे. तरी नवी मुंबईमधील तमाम क्रीडाप्रेमी नागरिकांनी या स्पर्धांच्या निमित्ताने नवी मुंबईत येणा-या नामवंत व्हॉलिबॉलपटूंचा खेळ बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या