क्राईमबार्शी

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील बार्शी तालुका पोलीस स्टेशन कडून गुन्हायातील किमती मुद्देमाल फिर्यादीस परत

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे – कोरफळे येथे दीपावली सणांमध्येच दिनांक 22/10/2022 रोजी रात्रो दरम्यान 1) सिध्देश्वर मस्के 2) सचिन हागरे रा, कोरफळे यांचे राहते घरी घरफोडी व जबरी चोरी झाली होती त्यामध्ये दोन्ही घटनेमध्ये जवळ जवळ 19 तोळे सोने गेले वाबत तक्रार प्राप्त झाली होती.ऐन दीपावली मध्येच सदर घटना घडल्याने सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या त्यावरून सदर गुन्हात 1) सुनील उर्फ काळ्या श्रावण शिंदे रा, उस्मानाबाद 2) रवी उर्फ झोक्या अरुण काळे रा,देवगाव 3) किरण अरुण पवार रा, राळेरास आरोपी व इतर आरोपी निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडे सदर गुन्हाचां तपास करून गुन्हाण्यातील गेले माला पैकी रुपये किमतीचा सोन्याचे मुद्देमाल त्यांचेकडून जप्त करण्यात आलेला होता सुदर मुद्देमाल मिळणे बाबत फिर्यादी यांनी प्रथम वर्ग न्यायालय बार्शी न्यायाधीश पठाण साहेब यांचेकडे अर्ज दाखल केला होता. त्यामुळे मा न्यायालय बार्शी यांची परवानगी मिळताच दोन्ही गुन्हायातील मूळ फिर्यादी यांना सदरचा 9 तोळे 1.5 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमती सुमारे 3,66,000/- रूपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे. त्याबाबत फिर्यादी यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक व पोलीस विभागाचे आभार व्यक्त केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button