न्याय विभागबार्शीमहाराष्ट्र

डोक्यात वीट मारून गंभीर मारहाण केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी शहरातील डमरे गल्ली येथील जखमी साक्षीदार यास अक्षय दिलीप पुदाने यास आरोपी हाताने मारहाण व शिविगाळ करीत असताना. फिर्यादी अमर अशोक शेवाळे सदरची भांडणे सोडवा सोडवी करीत असताना आरोपी अशोक महादेव गायकवाड याने रोडवर पडलेली विट उचलून डोक्यात मारून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली.बार्शी शहर पोलिस स्टेशन येथे गु.र.नंबर ५७१/२०१९ अन्वये फिर्याद दिली होती.

सदरील प्रकरणाची सुनावणी बार्शी येथील मे. ज्युडि.मॅजी.फर्स्ट क्लास सो.न्यायाधीश पी.व्ही.राऊत सो.यांच्यासमोर झाली. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले.तसेच सदर प्रकरणात आरोपीतर्फे अ‍ॅड.विवेक गजशिव यांनी काम पाहिले.सरकारी पक्षातर्फे तपासलेले साक्षीदारांचा पुरावा आरोपींना शिक्षा देण्याइतपत पुरेसा नाही व आरोपी विरुद्ध सबळ पुराव्याचा अभाव असल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील अ‍ॅड.विवेक गजशिव यांनी केला.सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी अशोक महादेव गायकवाड याची मे.न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button