क्राईमबार्शीमहाराष्ट्र

बार्शी बसस्थानकावर महिलेकडील तब्बल 7 तोळे सोन्याचे दागिने भरदिवसा लंपास

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधील तब्बल 7 तोळे सोन्याचे व 20 ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी दि. 11 एप्रिल दुपारी घडली. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.50000याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अरुणा हिंमतराव गिलबिले (वय ५५, रा. आष्ठा, ता. भूम, जि. धाराशिव) या आपल्या भावासोबत बार्शी एस.टी. बसस्थानकावर आल्या होत्या. त्या दुपारी सुमारे 2.15 वाजण्याच्या सुमारास धाराशिवकडे जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये चढल्या. बसमध्ये उभ्या असताना त्यांच्या पर्सची चैन उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पर्स तपासली असता आत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी बसमधून उतरून परिसरात शोध घेतला व चौकशी केली, मात्र दागिने मिळून आले नाहीत. अखेरीस अज्ञात चोरट्याने पर्समधील दागिने चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.50000चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे ३० ग्रॅमचे सोन्याचे गंठण, १० ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस , ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १८ ग्रॅमचे मिनी गंठण, ८ ग्रॅमचे पदक व मनीमंगळसूत्र तसेच 20 ग्रॅम चांदीचे करंडे असे सोन्या चांदीचे दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ईसामिया बहिरे करीत आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आपली मौल्यवान वस्तू व पर्सची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button